Special Report | खात्यांवरून शिंदे गटात नाराजी?
दीपक केसरकर महाविकास सरकारमध्ये मंत्री नव्हते. पण आता त्यांना शालेय शिक्षण आणि मराठी भाषा ही खाती देण्यात आलीय. विशेष म्हणजे केसरकर पर्यटन खात्यासाठी आग्रही होते. त्यावरुन त्यांनी नाराजीही व्यक्त केलीय.
मुंबई : खाते वाटप झालं आणि शिंदे गटातून नाराजी नाट्य सुरु झालं. दीपक केसरकरांना पर्यटन खातं हवं होतं. गुलाबराव पाटील, संदीपान भुमरेंना आधीपेक्षा मोठं खातं हवं होतं आणि दादा भुसेंना तर कृषीच्या बदल्यात तुलनेनं छोटं खातं आलं. गुलाबराव पाटलांकडे आधी पाणी पुरवठा आणि स्वच्छता खातं होतं. आताही तेच खातं त्यांना देण्यात आलंय. संदीपान भुमरे आधी रोजगार हमी योजनेचे मंत्री होते. आता पुन्हा रोजगार हमीचीच जबाबदारी मिळालीय. दादा भुसे यांच्याकडे आधी कृषी खातं होतं. आता त्यांना बंदरे व खनिकर्म खातं मिळालंय. दीपक केसरकर महाविकास सरकारमध्ये मंत्री नव्हते. पण आता त्यांना शालेय शिक्षण आणि मराठी भाषा ही खाती देण्यात आलीय. विशेष म्हणजे केसरकर पर्यटन खात्यासाठी आग्रही होते. त्यावरुन त्यांनी नाराजीही व्यक्त केलीय.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या...
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?
