Special Report | ‘दिव्य काशी, भव्य काशी’
काशीमध्ये फक्त एकच सरकार आहे. ज्यांच्या हातात डमरू आहे…असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भोलेनाथाच्या चरणी मस्तक टेकविले आणि यावेळी देशाच्या विकासासाठी जनता जनार्दनाला साकडे घालत तीन संकल्पाची मागणी केली.
काशीमध्ये फक्त एकच सरकार आहे. ज्यांच्या हातात डमरू आहे…असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भोलेनाथाच्या चरणी मस्तक टेकविले आणि यावेळी देशाच्या विकासासाठी जनता जनार्दनाला साकडे घालत तीन संकल्पाची मागणी केली. मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशाताील वाराणासीच्या काशी विश्वनाथ धामचे (Kashi Vishwanath Dham) लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ज्या कामगारांनी आपला घाम गाळून काशीमध्ये हा भव्य परिसर तयार केला, त्यांचे आभार यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मानले. कोरोनाच्या बिकट काळातही त्यांनी काम थांबवले नाही. मला या श्रमिकांना भेटण्याचे, त्यांचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. काशी तो काशी है! काशी तो अविनाशी है. काशी में एक ही सरकार है, जिनके हाथों में डमरू है, उनकी सरकार है, असे म्हणत पंतप्रधान एकदम तल्लीन झाले.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...

