Atul Bhatkhalkar | अनिल देशमुखांसारखे फरार होऊ नका, अतुल भातखळकर यांचा अजित पवारांना टोला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे. 

अजित पवार, पार्थ पवार व त्यांचे नातेवाईक यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी हा 6 महिन्यांच्या संशोधनाचा परिणाम आहे, शेतक-यांवर शरद पवार बोलले त्यानमुसार ही कारवाई असे बोलणे हास्यास्पद, कर नाही त्याला डर का, जे तपासातून समोर येईल त्याला  उत्तर द्या, असे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर अनिल देशमुखासारखे फरार होऊ नका, असा टोला देखील त्यांनी लगावल आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI