AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | क्रूझवर अटक केलेल्या मुलाची आई बर्गर घेऊन एनसीबी कार्यालयात, पोलिसांनी अडवलं

Mumbai | क्रूझवर अटक केलेल्या मुलाची आई बर्गर घेऊन एनसीबी कार्यालयात, पोलिसांनी अडवलं

| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 3:56 PM
Share

आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सतीजा, इस्मित सिंग चड्ढा, मोहक जैस्वाल, गोमीत चोप्रा आणि विक्रांत छोकर या 8 जणांना एनसीबीने अटक केली आहे.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीची धाड पडल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह (Aryan Khan) आठ तरुणांना अटक झाली आहे. मात्र या आरोपींच्या कुटुंबीयांकडून पोरांचे लाडकोड अजूनही सुरु असल्याचं दिसत आहे. आरोपींसाठी कुटुंबीय मॅकडॉनल्डचा बर्गर घेऊन गेल्याचं पाहायला मिळालं. क्रुझवर अटक केलेल्या एका मुलाची आई एनसीबी ऑफिसबाहेर पोहोचली. काही मुलांच्या नातेवाईकांनी त्यांच्यासाठी जेवण आणि कपडे आणले आहेत. एका आरोपीचे नातेवाईक त्याच्यासाठी चक्क मॅकडॉनल्डचा बर्गर घेऊन आले, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं. आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सतीजा, इस्मित सिंग चड्ढा, मोहक जैस्वाल, गोमीत चोप्रा आणि विक्रांत छोकर या 8 जणांना एनसीबीने अटक केली आहे. (Drug case arrested accuseds mother reaches NCB office with burger)