AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | इतिहासाची उजळणी,वर्तमानात वाद

Special Report | इतिहासाची उजळणी,वर्तमानात वाद

| Updated on: Jul 24, 2022 | 9:56 PM
Share

बाबासाहेब पुरंदरे यांच्याइतका अन्याय शिवाजी महाराजांवर कुणीही केला नाही असं सांगत पवारांनी खळबळ उडवून दिली. पवारांनी दादोजी कोंडदेव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा यत्किंचितही संबंध नव्हता असं वक्तव्य केलं. इतिहासाची उजळणी करताना पवारांनी समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही भाष्य केलं.

मुंबई :  शरद पवारांच्या या तीन वाक्यांमुळं महाराष्ट्रात पुन्हा एकदा तोच वाद निर्माण झालाय. तो वाद आहे बाबासाहेब पुरंदरे(Babasaheb Purandare) यांनी लिहिलेल्या इतिहासाचा. शनिवारी शरद पवारांच्या(Sharad Pawar) हस्ते श्रीमंत कोकाटे यांच्या ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि याच कार्यक्रमात बोलताना पवारांनी शरद पवारांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं लिहिल्याचा आरोप केला. पवारांचा निशाणा होता बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर. बाबासाहेब पुरंदरे यांच्याइतका अन्याय शिवाजी महाराजांवर कुणीही केला नाही असं सांगत पवारांनी खळबळ उडवून दिली. पवारांनी दादोजी कोंडदेव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा यत्किंचितही संबंध नव्हता असं वक्तव्य केलं. इतिहासाची उजळणी करताना पवारांनी समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही भाष्य केलं. शरद पवारांनी पुरंदरे यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर ब्राह्मण संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी पवारांनाच शिवछत्रपतींचं चरित्र लिहिण्याचं आवाहन केलंय. शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर याआधीही टीका केलीय. पुरंदरे यांनी जेम्स लेनचं कौतुक केल्यानंच वाद पेटल्याचं पवारांनी अनेकदा बोलून दाखवलंय. पवारांच्या या भूमिकेवर राज ठाकरेंनीही आक्षेप घेतला होता. पवार आणि राज ठाकरेंमध्ये जुगलबंदीही रंगली होती. बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणाबद्दलचा वाद याआधीही झालाय. आता राज्यात शिंदे आणि भाजपचं सरकार आल्यानंतर पवारांनी हा वाद पुन्हा उकरुन काढलाय. श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हे फक्त निमित्त ठरलंय.