Ahmedabad Plane Crash : अपघातग्रस्त विमानाचा DVR सापडला, काय आहे DVR?
Air India plane crash investigation : अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या प्रवासी विमान दुर्घटनेत नवीन अपडेट समोर आली आहे.
अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा DVR आता सापडलेला आहे. हा DVR आता फॉरेन्सिक टीमने ताब्यात घेतला आहे. अपघाताच्या चौकशीसाठी हा DVR महत्वाचा पुरावा असल्याचं म्हंटलं जातं आहे.
DVR म्हणजे डिजिटल व्हॉईस रेकॉर्डर. हा DVR विमानाच्या कॉकपीटमधील संवाद रेकॉर्ड करतो. DVR पायलट आणि एअर ट्राफिक कंट्रोलमधील संवाद देखील रेकॉर्ड करतो. तसंच कॉकपीटमधील अलार्म, स्विच आणि इंजिन आवाजही टिपतो. DVR शेवटच्या 2 ते 25 तासांचं ऑडिओ रेकॉर्डिंग साठवतो. हा DVR ब्लॅक बॉक्सचा महत्वाचा भाग असतो. DVR मुळे अपघाताचं नेमकं कारण शोधायला मोठी मदत होते. त्यामुळे कालच एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा अपघात नेमका कसा झाला, याचं कारण शोधण्यासाठी हा DVR अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. यातून काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

