आदित्य ठाकरेचा निकटवर्तीय डिनो मोर्याच्या घरी ईडीची धाड, मनी लाँड्रिंगची शंका, प्रकरण नेमकं काय?
मुंबईतील मिठी नदी कथित घोटाळा प्रकरणात ईडीने आपला मोर्चा आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे डिनो मोरिया यांच्याकडे वळवला. काल सकाळी आठ वाजल्यापासून ईडीने मोरियाच्या घरी छापे मारले आहेत.
आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या अभिनेता डिनो मोरियाच्या घरी ईडीने छापे टाकलेत. मुंबईतील मिठी नदीच्या कथित 65 कोटींच्या घोटाळ्यात मनी लॉन्ड्रिंगवरून डिनो मोरियाच्या घरी ईडीने धाड टाकल्याची माहिती आहे. मिठी नदीच्या घोटाळा प्रकरणात कंत्राटदार केतन कदमला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
डिनो मोरिया आणि केतन कदम एकमेकांना दोन दशकांपासून ओळखतात. डिनोचा भाऊ सँटिनो मोरिया आणि केतन कदमची पत्नी युबो राईड्स कंपनीत संचालक आहेत. केतन कदमने डिनो मोरियाला 14 लाखांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली. 14 लाखातले काही पैसे डिनो मोरियाने भावाच्या युबो राईड्स कंपनीत वळवले.
केतन कदमने घोटाळ्यातला पैसा डिनो मोरियाला पाठवल्याचा संशय आहे. त्यामुळे घोटाळ्याच्या पैशातून मनी लॉन्ड्रिंगच्या अँग्लने ईडीचा तपास सुरू आहे. तर केतन कदमने पैसे कर्ज म्हणून दिले असं डिनोचं म्हणणं आहे. मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदारांसह डिनो मोरियाची याआधी आर्थिक गुन्हे शाखेने देखील चौकशी केली आहे. तर कुणाचा राजकीय वरदस्त होता हे समोर येईल असं दरेकर म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा

