AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shilpa Shetty - Raj Kundra : राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी

Shilpa Shetty – Raj Kundra : राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी

| Updated on: Dec 02, 2024 | 10:57 AM
Share

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती, उद्योगपती राज कुंद्रा याच्या अडचणी वाढतच चालल्याचं दिसत आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा याला आज ईडीसमोर हजर रहावं लागणार आहे. चौकशीसाठी हजर रहावं यासाठी ईडीने त्याला यापूर्वीच समन्स बजावण्यात आलं होतं.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती, उद्योगपती राज कुंद्रा याच्या अडचणी वाढतच चालल्याचं दिसत आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा याला आज ईडीसमोर हजर रहावं लागणार आहे. चौकशीसाठी हजर रहावं यासाठी ईडीने त्याला यापूर्वीच समन्स बजावण्यात आलं होतं,अखेर आज त्याची चौकशी होणार आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात ईडीने गेल्या आठवड्यात 19 ठिकाणी छापेमारी केली होती. त्यामध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचं मुंबईतील घर, तसेच ऑफीसमध्ये छापा टाकण्यात आला होता. यामुळे मोठी खळबळ माजली होती.

त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी राज ठाकरे याला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणात सामिल असल्याच्या संशयावरून अन्य काही लोकांनाही ईडीने समन्स बजावत चौकशीसाठी बोलावलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरण हे मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा आणि इतरांविरुद्ध मे 2022 मध्ये दाखल केलेल्या दोन एफआयआर आणि आरोपपत्रांवरून उद्भवले. याप्रकरणी राज कुंद्रा आणि इतर आरोपींना देखील अटक करण्यात आली होती. आता शिल्पा शेट्टीचा नवरा पुनहा वादाच्या भोऱ्यात अडकल्याचे दिसत आहे.

Published on: Dec 02, 2024 10:57 AM