Pune : संत ज्ञानोबा अन् तुकोबांची पालखी पुण्यात, माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्ताची मोठी गर्दी
संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी असलेल्या नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरातील विश्वस्तांच्या हस्ते तुकारामांच्या पादुकांचं पूजन पार पडलं. यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.
जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात काल दाखल झाल्या आहेत. या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी ही पुण्यात दाखल झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात मोठी गर्दी केली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी असणाऱ्या नाना पेठेमधील निवडुंगा विठ्ठल मंदिराबाहेर दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी निवडुंगा विठ्ठल मंदिराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ही आहे. येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, तसेच यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे. तसेच या सर्व परिसरात लावण्यात आलेल्या 60 ते 70 सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे या ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर असल्याची माहिती मिळतेय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

