Eknath Khadse : माझ्या छातीवर 10-10 पोलीस, माझ्यावर पाळत का? माझं तोंड बंद… खडसे व्हिडीओ दाखवत भडकले
साध्या वेशाष आलेल्या पोलिसांना खडसेंनी विचारणा केली असता, त्या पोलिसांकडून असे सांगण्यात आले की, जगदाळे नावाच्या PSI कडून 5 ते 6 पोलिसांना पाठवण्यात आले होते, असं खडसे म्हणाले. यानंतर माझ्यावर पाळत ठेवण्याचं कारण काय? खडसेंचा सरकारला थेट सवाल
एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केली. यासंदर्भात बोलताना एकनाथ खडसेंनी माझ्या जावयाला अडकवण्यात येत असल्याचा दावा केलाय. एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी एक मोठा आरोप केला.
माझ्या स्वत:च्या घराबाहेर साध्या वेशात आठ ते दहा पोलीस पत्रकार परिषदेत पाळत ठेऊन होते आणि पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांसोबत आत येऊन बसले. माझ्यावर पाळत ठेवण्याचे काय कारण? असा सवाल एकनाथ खडसेंनी उपस्थित केला. खडसे पुढे असेही म्हणाले की, हे पोलीस असा वेशात घरामध्ये येऊन बसले आणि पोलिसांना पत्रकार परिषदेमध्ये येऊन बसण्याचा कोणी अधिकार दिला. या राज्यात काय सुरू आहे? मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि बोलण्याचा अधिकार असताना माझं तोंड बंद करण्याचा का प्रयत्न होतोय? असा सवाल करत खडसेंनी सरकारवरच निशाणा साधला. माझ्या छातीवर दहा-दहा पोलीस का आणून ठेवले जाताय? यामागे नेमकं कारण काय? सरकार कशाला आणि का घाबरतंय? असे सवाल उपस्थित करत खडसेंनी सरकारकडे या प्रश्नांवरील उत्तरांची मागणी केली आहे.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप

