VIDEO : आता कोणत्याही आमदाराची पक्ष बदलण्याची मनस्थिती नाही : एकनाथ खडसे
भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवत असतात. आता रावसाहेब दानवे यांनीही अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. मात्र, दानवे हे फक्त स्वप्न पाहतात, मनोरंजनाच्या गप्पा मारतात, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे यांनी काढला आहे.
भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवत असतात. आता रावसाहेब दानवे यांनीही अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. मात्र, दानवे हे फक्त स्वप्न पाहतात, मनोरंजनाच्या गप्पा मारतात, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे यांनी काढला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे नेहमीच महाविकास आघाडीला चिमटा काढतात. तुमचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हणतात. दोनच दिवसांपू्र्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले होते, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपली जबाबदारी पार पाडावी. आता त्यांनी बाहेर पडावे आणि काम करावे. मुख्यमंत्र्यांच्या पायाला भोवरा असावा, तोंडात साखर असावी, पण जे दाऊदला मदत करतात त्यांना हे सध्या मदत करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान

