Cabinet Expansion : बच्चू कडू यांना लवकरच चांगले मंत्रीपद मिळेल, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
आमदार बच्चू कडू नाराज असल्याच्या प्रश्नावर मंत्री दीपक केसरकरांनी भाष्य केलं. ते म्हणाले की. बच्चू कडू यांना भेटण्यासाठी आम्ही जाणार आहोत. सर्वांना योग्य तो सन्मान दिला जाईल.
मुंबई : आज मंत्रालयात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांनी काम सुरू होण्यापूर्वी शिवेसनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. मागच्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे -फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) रखडलं होता. अखेर तो पूर्ण झाला आहे. यावेळी नव्या मंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी आमदार बच्चू कडू नाराज असल्याच्या प्रश्नावर मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की. बच्चू कडू यांना भेटण्यासाठी आम्ही जाणार आहोत. सर्वांना योग्य तो सन्मान दिला जाईल. आमच्या मित्र पक्षांची आम्ही योग्य ती काळजी घेऊ, असं केसरकर म्हणालेत. यावेळी मंत्री दिपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर उत्तर दिली.
Published on: Aug 11, 2022 10:41 AM
जोरदार पावसात टेम्पो वाहून गेला! मावळमध्ये थरारक घटना
मुंबईकरांनो सावधान! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा! आजचा दिवस....
आळंदीत धोक्याची घंटा! इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय; वारकऱ्यांना....
राज्यभरात थैमान घालणाऱ्या पावसाचा आमदार निवासाला मोठा फटका, थेट...
