Cm Eknath Shinde : शिंदे सरकारच्या विस्तारानंतर आता खातेवटपही लांबणीवर पडणार, हाती आली अत्यंत महत्वाची माहिती

सस्पेन्स वाढला तो या मंत्र्यांच्या खाते वाटपाचा, लवकरच खातेवाटप जाहीर होईल म्हणता म्हणता आता खाते वाटपबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आले, या नव्या मंत्र्यांचे खाते वाटप आता लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिलीय.

Cm Eknath Shinde : शिंदे सरकारच्या विस्तारानंतर आता खातेवटपही लांबणीवर पडणार, हाती आली अत्यंत महत्वाची माहिती
शिंदे सरकारच्या विस्तारानंतर आता खातेवटपही लांबणीवर पडणार, हाती आली अत्यंत महत्वाची माहितीImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 9:37 PM

मुंबई : चाळीस दिवसाआधी एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर याचवेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात एकच सवाल रोज विचारला जाऊ लागला तो म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) कधी होणार? एकीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस रोज सांगायचे की लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार मात्र त्याला जवळपास चाळीस दिवस उलटले.  त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला नऊ ऑगस्टचा मुहूर्त मिळाला आणि शेवटी एकदाचा अठरा मंत्र्यांचा मंत्रिमंडळ शपथविधी पार पडला. मात्र त्यानंतर सस्पेन्स वाढला तो या मंत्र्यांच्या खाते वाटपाचा, लवकरच खातेवाटप जाहीर होईल म्हणता म्हणता आता खाते वाटपबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आले, या नव्या मंत्र्यांचे खाते वाटप आता लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिलीय.

मंत्र्यांकडून दोन दोन पर्याय मागवले

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या मंत्र्यांकडून कडून खात्यांबाबत दोन दोन पर्याय मागवल्याचे, तसेच मंत्र्यांच्या निवासस्थानाबाबत ही दोन दोन पर्याय मागवल्याचीही माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिलीय. खाते वाटपानंतर होणारी नाराजी टाळण्यासाठी हा फंडा राबविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच खातेवाटपाची संभाव्य यादीही सुत्रांकडून देण्यात आलीय.

कुणाला कोणतं खातं मिळू शकतं?

  1. मुंबई – मंगलप्रभात लोढा – विधी आणि न्याय
  2. ठाणे – एकनाथ शिंदे – नगरविकास खाते
  3. नागपूर – देवेंद्र फडणवीस – अर्थ आणि गृह
  4. ठाणे – रवींद्र चव्हाण – गृहनिर्माण
  5. रत्नागिरी – उदय सामंत – उद्योग
  6. सिंधुदुर्ग – दीपक केसरकर – पर्यटन आणि पर्यावरण
  7. पुणे – चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम
  8. सांगली – सुरेश खाडे – सामाजिक न्याय
  9. नगर – राधाकृष्ण विखे पाटील – महसूल आणि सहकार
  10. सातारा – शंभूराजे देसाई – उत्पादन शुल्क
  11. नाशिक – दादा भुसे – कृषी
  12. जळगाव – गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
  13. जळगाव – गिरीश महाजन – जलसंपदा
  14. नंदूरबार – विजयकुमार गावित – आदिवासी विकास
  15. औरंगाबाद – संदीपान भुमरे – रोहयो योजना
  16. औरंगाबाद – अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक
  17. औरंगाबाद – अतुल सावे – आरोग्य
  18. उस्मानाबाद- तानाजी सावंत – उच्च आणि तंत्र शिक्षण
  19. चंद्रूपर – सुधीर मुनगंटीवार – उर्जा आणि वन
  20. यवतमाळ- संजय राठोड – ग्रामविकास

लवकरच खातेवाटप होईल-केसरकर

तर खातेवाटपाबाबत मुख्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार असून, लवकरच खाते वाटपाचे काम उघड होणार आहे, आधी कोणाचे खाते होते, आता खाते कोणाला कोणते मिळणार किंवा प्रसारमाध्यमांमध्ये काय सुरू आहे. यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली, मात्र अद्याप खातेवाटपाचं ठरलं नाही, अशीही माहिती दीपक केसरकर यांनी दिलीय.

खातेवाटपात अनेक बदल दिसतील-फडणवीस

तर नव्या सरकारच्या खाते वाटपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलंय. या सरकारच्या खाते वाटपात अनेक मोठे बदल दिसतील, असा सूचक इशारा फडणवीसांनी दिल्याने कोणतं खाता कोणाला मिळणार? याबद्दलचा सस्पेन्स अजूनच वाढला आहे.

विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

तर आता या खातेवाटपावरून विरोधाक चांगलेच आक्रमक होण्याची शक्यता आहे. आधी मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार यांच्याकडून सडकून टीका होत होती. 40 जणांना मंत्रिपदाची गाजरं दाखवल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागणारच ना, अशी टीका अजित पवारांकडून झालेली अनेकदा पाहिलं आहे. त्यानंतर आता बिन खात्याचे मंत्री अशीही टीका विरोधकांकडून होऊ शकते.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.