AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न… मुंबई लोकल हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर

| Updated on: Jun 26, 2026 | 9:33 AM
Share

मुंबई लोकल ट्रेनमध्ये 22 वर्षीय मयंक लोहार यांच्या हत्येप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयंकचे वडील रमेश लोहार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत कुटुंबियांचे सांत्वन केले.

मुंबई लोकल ट्रेनमध्ये 22 वर्षीय मयंक लोहार यांच्या हत्येप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयंकचे वडील रमेश लोहार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल आणि मयंकला न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांना कॉल करून चर्चा करतील असंही सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी मयंकच्या वडिलांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. यावेळी रमेश लोहार यांनी आरोपीला केवळ कठोर शिक्षा नको, तर थेट फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. या घटनेमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. चर्चगेट ते नालासोपारा फास्ट लोकलमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. डब्याचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून आरोपीने मयंकच्या पोटात चाकूने वार केला. गंभीर जखमी झालेल्या मयंकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Published on: Jun 26, 2026 09:33 AM

Follow Us