Arms License Controversy : शिंदेंकडून योगेश कदमांची पाठराखण; स्पष्टच म्हणाले, घाबरायचं काही कारण नाही…
सचिन घावळ शस्त्रपरवाना प्रकरणी आरोपांनंतर एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांची पाठराखण केली. चुकीचे केले नसल्यास घाबरू नका, असे शिंदे यांनी कदमांना सांगितले. दुसरीकडे, अजित पवार यांनी नियमानुसार कारवाईची भूमिका घेतली. पुणे पोलीस आयुक्तांनी कोणतीही शिफारस आली नसल्याचे स्पष्ट केले, तर रामदास कदमांनी उच्चपदस्थ व्यक्तीच्या दबावाचा मुद्दा मांडला.
सचिन घायवळ शस्त्रपरवाना प्रकरणात योगेश कदम यांच्यावर आरोप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची पाठराखण केली आहे. योगेश कदम यांनी मुक्तागिरी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी शिंदेंनी कदमांना, “चुकीचे केले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही, विरोधकांच्या टिकेला न जुमानता काम सुरु ठेवा,” असे सांगितले. त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिल्याचेही स्पष्ट केले.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात नियमानुसार कारवाईचा आग्रह धरला आहे. कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही आणि दोषींवर कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले. योगेश कदम यांनी कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीसाठी शिफारस केली नसल्याचा दावा केला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनीही त्यांच्याकडे कोणतीही शिफारस आली नसल्याचे आणि कुणालाही परवाना दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

