Dahanu Elections : रावणाची लंका अहंकारानं जळून खाक, शिंदेंचा रोख कुणावर? तर फडणवीस म्हणाले, लंका तर आमचा भरत पेटवणार
पालघरच्या डहाणूमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रावणाची लंका या उपमेवरून राजकीय वाक् युद्ध रंगले. शिंदे यांनी अहंकाराची लंका जळाल्याचे म्हटले, तर फडणवीसांनी ‘भरत’ ही लंका पेटवणार असे प्रत्युत्तर दिले.
पालघरच्या डहाणू येथे झालेल्या प्रचारसभेत महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी रावणाची लंका या प्रतीकाचा वापर करत एकमेकांवर शाब्दिक वार केले. एकनाथ शिंदे यांनी पालघरच्या डहाणू येथे बोलताना म्हटले की, रावणाची लंका अहंकाराने जळून खाक झाली होती. यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी याला प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी सभेत सांगितले की, प्रभू श्रीरामाला मानणारा पक्ष आणि त्या पक्षाचा उमेदवार भरत राजपूत ही लंका पेटवणार आहे. त्यांनी डहाणूतील जनतेला एकाधिकारशाही आणि अहंकाराच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. २ तारखेला (निवडणुकीच्या दिवशी) हेच काम करायचे आहे असे त्यांनी सूचित केले.
फडणवीस यांनी भाजपचे उमेदवार भरत राजपूत यांच्या माध्यमातून डहाणू नगरपालिकेत केवळ खुर्ची मिळवण्यासाठी किंवा झेंडा लावण्यासाठी नव्हे, तर समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले. विकास आणि कामे कशी करून घ्यायची हे माहीत असलेल्या उमेदवाराला निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

