Raj Thackeray : राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शिंदेसेनेत खलबतं सुरू? काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर
Eknath Shinde Will Invite Raj Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच राज ठाकरेंना स्नेहभोजनासाठी आमंत्रित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच राज ठाकरेंना स्नेहभोजनासाठी आमंत्रित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे आपल्या निवासस्थानी राज ठाकरेंना स्नेह भोजनासाठी आमंत्रित करणार आहेत, असं सूत्र सांगत आहेत. त्यासाठी मंत्री उदय सामंत यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आलेली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आलेला असतानाच राज ठाकरेंना महायुतीत सामील करून घेण्याच्या हालचालींना देखील वेग आलेला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
दरम्यान, कोणाच्या घरी कोणी जेवायला गेलं किंवा आपल्या घरी कोणी जेवायला आलं तर त्यावरून युती होत नसते. त्यासाठी बऱ्याचशा गोष्टींवर हा निर्णय अवलंबून असतो. तो निर्णय राज ठाकरे घेतील असं मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हंटलं आहे. तर राज ठाकरेंनी स्नेह भोजनाला जायचं की नाही जायचं हे त्यांनी स्वत: ठरवावं, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हंटलं आहे.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा

