Eknath Shinde : मुंबई महापौरपदावर अन् फोडाफोडीवरून एकनाथ शिंदे स्पष्टच म्हणाले…फडणवीसांच्या सक्त..
भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील फोडाफोडीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. युतीला गालबोट लागू नये, अशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना सूचना दिल्या आहेत. अमित शहांकडे तक्रार केली नसल्याचे शिंदेंनी म्हटले. मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. संजय राऊत लवकरच मैदानात परततील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील फोडाफोडीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीव्ही9 मराठीशी बोलताना भूमिका मांडली. युतीमध्ये कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना दिल्या असल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले. मैत्रीपूर्ण लढतीत सकारात्मक प्रचारावर भर देण्याचे ठरले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे महाराष्ट्र भाजपच्या धोरणांविषयी तक्रार केल्याच्या चर्चा शिंदेंनी फेटाळल्या. तक्रार करण्याचा माझा स्वभाव नाही, असे म्हणत त्यांची भेट एनडीएच्या विषयांवर असल्याचे शिंदेंनी सांगितले. महायुतीचाच महापौर मुंबईत बसणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही शिंदेंनी नमूद केले.
Published on: Nov 25, 2025 10:23 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
