मला धमकावणारा नक्षलवादी मारला की नाही माहीत नाही – एकनाथ शिंदे

गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये काल झालेल्या चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाले आहेत. ही चकमक 9 ते 10 तास सुरू होती. या चकमकीत काही पोलीस जखमी झाले होते. मात्र, त्याही अवस्थेत त्यांनी झुंज देत नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं, अशी माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ठाणे: गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये काल झालेल्या चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाले आहेत. ही चकमक 9 ते 10 तास सुरू होती. या चकमकीत काही पोलीस जखमी झाले होते. मात्र, त्याही अवस्थेत त्यांनी झुंज देत नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं, अशी माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या ऑपरेशनची माहिती दिली. पोलीस आणि सी-16 टीमने 26 नक्षलवाद्यांचा एन्काऊंटर केला. ही गेल्या वर्षभरातील मोठी कारवाई आहे. देशातीलही ही मोठी कारवाई आहे.

Published On - 12:50 pm, Sun, 14 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI