Bharat Gogawale : ..हा तटकरेंचा हातखंडाच, दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक अन्.. महाड राड्याप्रकरणी गोगावले यांचा गंभीर आरोप
महाड येथील राड्याप्रकरणी विकास गोगावले, महेश गोगावले आणि विजय मालुसरे यांच्यावर २१ कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत मंत्री भरत गोगावले यांनी तटकरेंवर थेट षडयंत्राचा आरोप केला असून, "दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप दाबायचा, हा तटकरेंचा जुना हातखंडा आहे," असे म्हटले आहे.
महाड येथील गोगावले आणि तटकरे समर्थकांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी विकास गोगावले, महेश गोगावले आणि विजय मालुसरे यांच्यावर २१ विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेवर बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी थेट सुनील तटकरेंवर आरोप केले. त्यांच्या मते, महाडमधील हा राडा तटकरेंच्या डॅमेज करण्याच्या षडयंत्राचा भाग आहे. गोगावले यांनी म्हटले की, “दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप दाबायचा, हा तटकरेंचा गेल्या अनेक वर्षांचा हातखंडा आहे.” त्यांनी रोहा येथील निवडणुकीत भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा आणि आपल्या कार्यकर्त्यांकडून कधीही भानगड झाली नसल्याचा दावा केला.
आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतच्या आरोपांना उत्तर देताना, त्यांनी १९९७ मधील घटनेची कबुली दिली, परंतु त्यानंतर त्यांच्यामुळेच एमआयडीसी परिसरात शांतता प्रस्थापित झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “आम्ही कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप दाबलेला नाही. जो इव्हिडन्स घडला, तो आम्ही स्वतः केला आणि मान्य केले.” शांत महाडमध्ये दूषित वातावरण निर्माण करण्याचे काम तटकरेंकडूनच होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा

