आलमगीर औरंगजेबावरून राजकीय आखाडा तापला; विरोधक-सत्ताधारी आमने सामने
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो, असा टोला मंत्री भरत गोगावले यांना लगावला होता. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत धुसफूस सुरू आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील वाद आता टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. आजचा औरंगजेब हा सुतारवाडीमध्ये बसलाय, अशी शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी नाव न घेता सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका केली. दरम्यान, चुकीच्या पद्धतीने राजकारण कराल तर रायगड लोकसभा लढवण्याची आमची तयारी आहे, असा थेट इशाराही महेंद्र थोरवेंनी यांनी दिलाय. तर कर्वेंची औरंगजेबी वृत्ती आहे, असा राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण आणि आनंद परांजपे यांच्याकडून निशाणा साधण्यात आलाय. दरम्यान, महेंद्र थोरवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘छावा’ चित्रपटातील औरंगजेबाचा दाखल देत महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांना औरंगजेबाची उपमा दिली. ‘आजचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय’, अशी सडकून टीका त्यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

