‘शरद पवार यांची गुगली त्यांच्या पक्षाला डुबवून गेली’, संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात
VIDEO | 'स्वत:ला घरात कोंडून घेणारे आम्हाला काय डांबणार?', एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोचक सवाल.
मुंबई, २४ ऑगस्ट २०२३ | ‘स्वत:ला घरात कोंडून घेणारे आम्हाला काय डांबणार?’, असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक सवाल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आमचं म्हणणं ऐकावं, यासाठी आम्ही त्यांच्या दरवाजाच्या बाहेर उभे होतो. मात्र, त्यावेळी ते बाहेर यायलाच तयार नव्हते. त्यांनी स्वतःला डांबून ठेवलं होतं. तेव्हा त्यांनी आमचं ऐकलं असतं तर कदाचित त्यांच्यावर आज ही वेळ नसती. आज उद्धव ठाकरे यांचा पक्ष कुठं आहे? त्यांनी एकदा पाहावं. त्याबरोबरीने राष्ट्रवादी आणि काँग्रेस कुठे आहे? हे देखील त्यांनी पाहावं. शरद पवार यांनी टाकलेली गुगली त्यांच्या पक्षाला डुबवून गेली आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हणत उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

