Eknath Shinde : एकाने मराठीची तळमळ अन् दुसऱ्याने खुर्चीची मळमळ बोलून दाखवली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Eknath Shinde Slams Thackeray Brothers : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर जोरदार टीका केली.
एका वक्त्याने मराठीबद्दलची तळमळ व्यक्त केली, तर दुसऱ्याने सत्तेची आणि खुर्चीची मळमळ बोलून दाखवली. काही लोकांचे म्हणणे होते की, या मेळाव्याला “झेंडा नाही, अजेंडा नाही.” मात्र, एका वक्त्याने मराठीचे पथ्य पाळले, तर दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे मांडला, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी भाषेबद्दलची तळमळ दिसून आली, परंतु उद्धव ठाकरे यांच्या भाषणात केवळ सत्ता आणि स्वार्थाची हाव दिसली, असे शिंदे यांनी म्हटले. या मेळाव्याने मराठी माणसाच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात ‘पुष्पा’ चित्रपटातील “उठेगा नहीं साला” या डायलॉगद्वारे शिंदेंवर टीका केली. याला प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले, “हा डायलॉग उद्धव ठाकरेंनाच शोभतो.” त्यांनी पुढे उपरोधिकपणे म्हटले की, तीन वर्षांपूर्वी “दाढीवरून अर्धाच हात फिरवल्याने” उद्धव ठाकरे आडवे झाले आणि अजूनही सावरले नाहीत. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. “पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता तर काय झाले असते, याचा विचार त्यांनी करावा,” असे शिंदे म्हणाले. फक्त बोलण्याने काही होत नाही, त्यासाठी मनगटात ताकद हवी, असेही ते म्हणाले.

Padalkar : तुम्हाला जमत नसेल तर मी बोलत नाही, पडळकर भरसभागृहात भडकले

एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, 'विधान भवनाचं पावित्र्य ...'

भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?

आव्हाडांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या अन्..
