Latur News : वृद्ध दाम्पत्याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल होताच सहकार मंत्री मदतीसाठी धावले
Latur News : वृद्ध दाम्पत्याचा शेतीचा व्हिडीओ व्हायरल होताच मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
शेतीकामाचा खर्च परवडणारा नसल्याने एका वृद्ध दांपत्याने स्वत:ला औताला जुंपून घेत शेतीची कामं केल्याचा व्हिडीओ लातूरमधून समोर आला आहे. लातूरच्या हडोळती गावच्या वृद्ध दाम्पत्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अनेकांकडून या वृद्ध दाम्पत्याला मदत करण्यात येत आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी देखील या वृद्ध आजी – आजोबाना फोन केला असुन तुमचं कर्ज मी फेडतो अशी ग्वाही देत मदतीचा हात पुढे केला आहे. बियाबियाण आणि खतं देखील पाठवून देतो असंही यावेळी बाबासाहेब पाटलांनी म्हंटलं आहे.
हडोळती गावच्या एका वृद्ध दाम्पत्याचा काळजाला चरे पाडणारा एक व्हिडीओ आज समोर आला. शेतीचा खर्च परवडत नाही. 40 हजारांचं कर्ज फेडणंही शक्य नाही त्यामुळे या दांपत्याने स्वत:लाच औताला जुंपून घेत शेतीत राबायला सुरुवात केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल घेत मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या दाम्पत्याला मदतीचा हात दिला आहे.