'लाडक्या बहिणीं'ना जाहीर दम देणं धनंजय महाडिकांना भोवणार? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

‘लाडक्या बहिणीं’ना जाहीर दम देणं धनंजय महाडिकांना भोवणार? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

| Updated on: Nov 10, 2024 | 4:58 PM

धनंजय महाडिक यांनी केलेल्या वक्तव्यानंतर चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान, धनंजय महाडिक यांच्यावर विरोधकांकडून हल्लाबोल करण्यात येत असताना त्यांनी राज्यातील महिलांची बिनशर्त माफी मागितली आहे. असे असताना निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजप खासदार धनंजय महाडिक यांना जाहीरपणे ‘लाडक्या बहिणीं’ना दम देणं भोवणार असल्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून धनंजय महाडिक यांना आक्षेपार्ह वक्तव्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून बजावण्यात आलेल्या नोटीसीनंतर धनंजय महाडिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर येथील जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता-2023 कलम 179 अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर निवडणूक आयोगाकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, याबाबतचा तत्काळ खुलासा सादर करावा, अशी नोटीस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून धनंजय महडिक यांना पाठवण्यात आली आहे. ‘लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर इथं काँग्रेसची निघाली आणि त्यामध्ये आपल्या योजनेचे 1500 रुपये घेतात त्या महिला दिसल्या, तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या. घ्यायचे आपल्या शासनाचे आणि गुण त्यांचे गायचे असे चालणार नाही.’, असं वक्तव्य करत धनंजय महाडिक यांनी जाहीरपणे महिलांना दमदाटी केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Nov 10, 2024 04:58 PM