Divya Mittal : IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली त्या शाळेची कहाणी, व्यवस्थेतून प्रश्न सुटत नसतील तर…
माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातून राजकारणाची सुरुवात करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका महिलेने शाळेची मागणी केली असूनही, तीन वर्षांनीही ती पूर्ण न झाल्याच्या घटनेने त्यांना हा निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त केले.
माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकारणात प्रवेश करण्याची मोठी घोषणा केली आहे. दिव्या मित्तल आता सक्रिय राजकारणाचा भाग बनणार असून, त्या उत्तर प्रदेशातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करतील. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आपल्या प्रशासकीय अनुभवाचा उपयोग जनसेवेसाठी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. एका कार्यक्रमात बोलताना दिव्या मित्तल यांनी एका हृदयद्रावक घटनेचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, एक महिला त्यांच्याकडे मदतीसाठी आली होती. तिने मॅडम, आमच्या गावात शाळा फक्त पाचवीपर्यंतच आहे. त्यानंतर मुलांचे शिक्षण थांबते. मला पुढील वर्गापर्यंत शाळा हवी आहे अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे, त्या महिलेच्या घरात पाणी नसतानाही तिने स्वतःसाठी नव्हे तर मुलांच्या शिक्षणासाठी शाळेची मागणी केली होती.
दिव्या मित्तल यांनी आवश्यक नियम आणि मंजुऱ्या पाहून शाळेला मान्यता दिली होती. मात्र, तीन वर्षे उलटूनही त्या शाळेच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही. या घटनेतून त्यांना प्रशासकीय व्यवस्थेतील हेतूचा अभाव प्रकर्षाने जाणवला. पैसा, नियम आणि मंजुरी असतानाही काम पूर्ण होत नसल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. अशा प्रकारच्या समस्यांवर थेट राजकारणातूनच उपाय शोधता येतील या विचारानेच दिव्या मित्तल यांनी आता राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
Published on: Sep 29, 2026 02:27 PM
IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊत...
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं...
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील...

