Aamir Khan Kiran Rao Divorce | मि. परफेक्शनिस्ट आमिर खानचा दुसऱ्यांदा घटस्फोट, किरण रावसोबत काडीमोड

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खान आणि किरण रावने संयुक्त निवेदन जारी करुन या निर्णयाविषयी माहिती दिली.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेता आमिर खानने (Amir Khan) पत्नी किरण रावपासून (Kiran Rao) विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खान आणि किरण रावने संयुक्त निवेदन जारी करुन या निर्णयाविषयी माहिती दिली. (Bollywood Actor Aamir Khan and his wife Kiran Rao Divorce)

“गेल्या 15 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आम्ही घटस्फोट घेत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू,” असे या निवेदनात म्हटले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

Published On - 12:35 pm, Sat, 3 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI