आम्ही जमीन दिली पण आम्हाला ‘सोने’ मिळाले, जेव्हा बासवाडा येथील शेतकऱ्याने मानले पीएम मोदी यांचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या दौऱ्यावर बासवाडा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सोलार ऊर्जेमुळे शेतकऱ्यांना कसा फायदा झाला याबद्दल एका शेतकऱ्याने त्यांचे आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी राजस्थानच्या दौऱ्यावर होते. राजस्थानातील बासवाडा येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यावेळी हृदयापासून आभार मानले. हा शेतकरी यावेळी म्हणाला की सोलार प्लांट लावल्यानंतर माझे स्वप्न साकार झाले आहे. तसे पाहिले तर आम्हाला अन्नदाता म्हणून ओळखले जात होते. परंतू आता तुमच्या मेहरबानी मुळे आम्ही अन्नदादा ऊर्जा दाता बनले आहोत. आम्ही तुम्हाला जमीन दिली आणि तुम्ही आम्हाला त्यातून सोने उगवून दिले. लोकांनी सांगितले की ‘आलू से सोना उगा’ पण आलूतून सोने उगवले नाही पण जमीनीतून उगवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा खास मानला जात आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मोठी भेट दिली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८०० मेगावॅटच्या आण्विक ऊर्जा प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

