VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1 PM | 8 January 2022

पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटलेला नाही. जोपर्यंत राज्य शासनात विलीनीकरण नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका स्वारगेट आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दुसरीकडं स्वारगेट आगारातून अखेर लालपरी बाहेर पडल्याने महामंडळ व एसटी कर्मचाऱ्यांच्यामध्ये बाचाबाची झाली.

पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटलेला नाही. जोपर्यंत राज्य शासनात विलीनीकरण नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका स्वारगेट आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दुसरीकडं स्वारगेट आगारातून अखेर लालपरी बाहेर पडल्याने महामंडळ व एसटी कर्मचाऱ्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नसला तरी करार तत्वावरील खासगी चालकांच्या मदतीने एसटी सेवा सुरु करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.  त्यानुसार आगारातून आज पाहिली एसटी बाहेर पडली. मात्र आंदोलक कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत आगार बाहेर पडत असलेली एसटी अडवत कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला. एसटी आगार बाहेर काढली जात आहेत असे म्हणताचकर्मचारी आगारात जमा झाले.  त्यांनी आगारातच ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेध केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI