VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 20 July 2021

विठ्ठल मंदिरासमोर आकर्षक टिळ्यांची रांगोळी काढण्यात आली आहे. तर सिंधुदुर्गच्या समुद्रकिनारी वाळू, रांगोळीच्या माध्यमातून विठुरायाला साकारण्यात आले आहे. 

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2021) पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला.  सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली.

विठ्ठल मंदिरासमोर आकर्षक टिळ्यांची रांगोळी काढण्यात आली आहे. तर सिंधुदुर्गच्या समुद्रकिनारी वाळू, रांगोळीच्या माध्यमातून विठुरायाला साकारण्यात आले आहे.  आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) या दाम्पत्याने महापूजा केली.