Sanjay Raut आणि Sudhir Mungantiwar यांच्यात वार-पलटवार

काँग्रेससोबत जाण्याऐवजी मी शिवसेना बंद करेल, मी पक्ष विसर्जित करेल इतकी तिखट भूमिका ठाकरे यांची होती. भाजप आणि शिवसेनेच्या विचारात सामर्थ्य होतं. सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष कधी एकत्र आले नव्हते’, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 23, 2022 | 6:42 PM

चंद्रपूर : शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती. त्यानिमित्त राज्यभरात सर्वपक्षीय नेत्यांकडून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. त्याचबरोबर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्नही केला. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी होऊ शकली नसती, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे. त्याचबरोबर ‘ज्या आघाडीला सुरुवातीला महाशिव आघाडी असं नामकरण केलं जाणार होतं, त्याऐवजी शिव या शब्दाला ज्यांनी विरोध केला, त्यांच्यासोबत बाळासाहेब कधीच गेले नसते. विचाराच्या आधारावर एक राजकीय पक्ष निर्माण झाला होता. काँग्रेससोबत जाण्याऐवजी मी शिवसेना बंद करेल, मी पक्ष विसर्जित करेल इतकी तिखट भूमिका ठाकरे यांची होती. भाजप आणि शिवसेनेच्या विचारात सामर्थ्य होतं. सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष कधी एकत्र आले नव्हते’, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें