Special Report | शिवसेना भवनासमोर शिवसेना-भाजपमध्ये बाचाबाची, पाहा स्पेशल रिपोर्ट

राम मंदिराच्या कथित जमीन (Ram Mandir Land) घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन आज मुंबईत तुफान धुमश्चक्री झाली. शिवसेना आणि भाजप (Shiv Sena BJP) कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर प्रचंड हाणामारी केली.

मुंबई : राम मंदिराच्या कथित जमीन (Ram Mandir Land) घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन आज मुंबईत तुफान धुमश्चक्री झाली. शिवसेना आणि भाजप (Shiv Sena BJP) कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर प्रचंड हाणामारी केली. भाजप युवा मोर्चाने (BJP Yuva Morcha) शिवसेनेचे आरोप बिनबुडाचे असल्याचा आरोप करत, माफी मागण्यासाठी थेट शिवसेना भवनावर (Shiv Sena Bhawan) मोर्चा काढला. मात्र या मोर्चाची कुणकुण लागल्याने, सेना भवनासमोर आधीच शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमले होते. ज्यावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना सोनिया सेना अशा घोषणा देण्यास सुरुवात केली, त्यावेळी बाचाबाचीला सुरुवात झाली. या बाचाबाचीनंतर थेट हाणामारीला सुरुवात झाली. याच घटनाक्रमाची माहिती देणारा हा स्पेशल रिपोर्ट…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI