Vasai | वसईत दोन गटाच तुंबळ हाणामारी, हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट

 वसईत दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसई पश्चिम अंबाडी रोडवरील भाजी मार्केटसमोरील मध्यरात्री सव्वाबारा वाजताची ही दृश्यं आहेत.

वसई : वसईत दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसई पश्चिम अंबाडी रोडवरील भाजी मार्केटसमोरील मध्यरात्री सव्वाबारा वाजताची ही दृश्यं आहेत.भर रस्त्यावर दोन गटांमध्ये ठोसा-बुक्क्यांनी हाणामारी झाली. मात्र ही मारामारी करणारे कोण आहेत, नेमकी का मारामारी करत आहेत, हे मात्र स्पष्ट झाले नाही. मात्र हाकेच्या अंतरावर माणिकपूर पोलीस ठाणे असतानाही मारामारी करणाऱ्यांची एवढी हिंमत वाढल्याने वसईत कायदा सुव्यस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI