महागाईचा मार त्यात वाढणार खिशावरील भार; आजपासून ‘या’ गोष्टी बदलणार
आजपासून पैशांशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहे. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. १ एप्रिल म्हणजेच आजपासून कोणते नियम बदलणार आहेत. जाणून घ्या...
आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरूवात झाली आहे. आजपासून पैशांशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहे. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. १ एप्रिल म्हणजेच आजपासून कोणते नियम बदलणार आहेत. जाणून घ्या… विना केवायसी फास्टटॅग आजपासून बंद पडणार आहे. सर्व करदात्यांसाठी नवीन करप्रणाली लागू होणार आहे. तर पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंकीगची मूदतही संपली आहे. पीएफ खाते ट्रान्सफरसाठी अर्ज करण्याऐवजी आता ऑटोट्रान्सफर होणार आहे. ई विमा खाते सर्वांना बंधनकारक असणार आहे. नवीन विमा पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात काढणे बंधनकारक असणार आहे. क्रेडिट कार्डच्या नियमांत एसबीआय कार्डने मोठा बदल केला आहे. नव्या नियमानुसार, आता सर्व एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरल्यास रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...

