Breaking | परमबीर सिंग, सचिन वाझे यांच्याविरोधात पहिलं दोषारोपपत्र दाखल

एसीपी संजय पाटील यांनी वाझे आणि परमबीर यांच्याविरोधात जबाब दिलाय. त्या जबाबात काही खळबळजनक खुलासे त्यांनी केले आहेत. त्यामुळे एसीसीपी पाटील यांचा जबाब अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. एसीपी पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे बार आणि हॉटेल मालक यांच्या मिटिंगवेळी सचिन वाझेने त्यांना सांगितलं होतं की, 1 नंबर परमबीर सिंह हेच आहेत.

मुंबई : राज्याच्या पोलीस खात्यात आणि राजकारणात खळबळ माजवलेल्या खंडणी प्रकरणात गुन्हे शाखेने आज परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्याविरोधात आज पहिलं दोषारोपपत्र दाखल केलंय. या प्रकरणात आतापर्यंत 36 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेत. एसीपी संजय पाटील यांनी वाझे आणि परमबीर यांच्याविरोधात जबाब दिलाय. त्या जबाबात काही खळबळजनक खुलासे त्यांनी केले आहेत. त्यामुळे एसीसीपी पाटील यांचा जबाब अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. एसीपी पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे बार आणि हॉटेल मालक यांच्या मिटिंगवेळी सचिन वाझेने त्यांना सांगितलं होतं की, 1 नंबर परमबीर सिंह हेच आहेत. 1 नंबर म्हणजे परमबीर सिंह असा जबाब वाझेबरोबरच एसीपी संजय पाटील यांनीही दिला आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. बार चालकांकडून सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI