कोल्हापूर : चंदगडच्या ताम्रपर्णी नदीला पूर; कोवाड परीसर भितीने धास्तावला, पूरात पाणी घुसले कोवाड बाजार पेठेत
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा तालुक्यात तर पावसाने हैदोस घातला आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे चंदगडच्या अनेक नद्यांना पूर आला आहे. ज्यामुळे चंदगडचा संपर्क बेळगाव, गडहिंग्लजशी तुटला आहे.
कोल्हापूर, 25 जुलै 2023 : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा तालुक्यात तर पावसाने हैदोस घातला आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे चंदगडच्या अनेक नद्यांना पूर आला आहे. ज्यामुळे चंदगडचा संपर्क बेळगाव, गडहिंग्लजशी तुटला आहे. येथे अडकूर, कोवाडसह नागनवाडी आणि दाटे जवळ पाणी आल्याने रस्ते बंद झाले आहेत. त्याचदरम्यान येथील ताम्रपर्णी नदीला पूर आल्याने चंदगड तालुक्यातील कोवाड बाजारपेठेत पूराचे पाणी शिरले आहे. ज्यामुळे बाझार पेठेतील व्यापारी वर्गाची दैना उडाली असून अनेकांच्या दुकानांचे आणि घरांचे नुकसान झाले आहे. पावसाने ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

