जळगावमध्ये महाविकास आघाडीत कॉंग्रेसचा खोडा, हे माजी खासदार म्हणाले…
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांचे वजन आहे. मात्र, त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे भाजपला जिल्ह्यात खिंडार पडले आहे. तर, शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे.
जळगाव | 28 ऑक्टोबर 2023 : महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि कॉंग्रेस यांच्यात अद्याप जागावाटप निश्चित झालेले नाही. समसमान जागावाटप व्हावे अशी मागणी याआधीच ठाकरे गटाने केली आहे. मात्र, याच जागावाटपावरून जळगावमध्ये राजकीय कुरघोडी सुरु झालीय. रावेर लोकसभेचे काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील यांनी जिल्ह्यातील दोन्ही जागा कॉंग्रेसच लढणार असा दावा केलाय. जळगावमधील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा आणि विधानसभेच्या सहा जागाही आम्ही मागणार आहोत, असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. त्यानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी मेळावे, भव्य सभा घेण्यात येणार आहेत. लोकसभा, विधानसभा मतदारसंघात आमची ताकद आहे. त्यामुळे या जागा आम्ही मागणार आहोत असेही उल्हास पाटील म्हणाले.
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?

