Mehbooba Mufti : खुदा न खास्ता अगर… भारत-पाक तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन् मोठं वक्तव्य
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाल्या, युद्धासारखी परिस्थिती जम्मू आणि काश्मीरमधील लोकांचा बळी घेत आहे. लष्करी कारवाई हा कोणत्याही गोष्टीवर उपाय नाही.
जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानी सैन्याकडून सामान्य नागरिकांना लक्ष्य करून त्यावर गोळीबार केला जात आहे. तर दुसरीकडे भारतीय लष्करही पाकिस्तानच्या चिथावणीखोर कारवायांना जशास तसं प्रत्युत्तर देताना दिसतंय. अशातच जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे.
भारत आणि पाकिस्तानात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीवर बोलताना मेहबूबा मुफ्ती यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. सध्या सुरू असलेल्या तणावामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे संयम बाळगून तणाव कमी करण्याची वेळ आली आहे. कारण निष्पाप लोकांचा यात बळी जात आहे. पुढे त्यांनी असेही म्हणाले, दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी पंतप्रधानांनी हा प्रश्न चर्चेद्वारे सोडवावा. दोन्ही देशांकडे न्यूक्लिअर पॉवर म्हणजेच अण्वस्त्रधारी आहेत, देव करो, जर अण्वस्त्रांचा वापर झाला तर कोणीही वाचणार नाही, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?

