Anil Deshmukh : अनिल देशमुखांवर नागपुरात हल्ला, गाडीवर दगडफेक अन् डोक्याला गंभीर दुखापत
काल महाराष्ट्रातील प्रचारतोफा थंडावल्या. त्यातच सोमवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काल हल्ला करण्यात आला. नरखेड येथील शेवटची प्रचारसभा आटोपून ते काटोलच्या दिशेला जात होते. या दरम्यान काटोल जलालखेडा मार्गावर बेलफाट्याजवळ अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर अनिल देशमुख यांना उपचारासाठी नागपुरातील मॅक्स हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पारडसिंगाजवळील बेल फाटा या परिसरात दगडफेक करण्यात आली. गाडीच्या समोरील काचेवर दगडफेक झाल्याने गाडीच्या काचेचा चक्काचूर झाला. गाडीच्या समोरची काच फुटली. यावेळी पोलिसांकडून गाडीची तपासणी करण्यात आली. यावेळी हल्लेखोर “भाजप जिंदाबाद” आणि “अनिलबाबू मुर्दाबाद” अशा घोषणा देत होते, असे सांगितले जात आहे.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

