Dhananjay Mahadik Uncle | उद्या मुन्नाची मिरवणूक बघाच
नंजय यांच्या विजयानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आपली प्रतिक्रिया देताना उद्या मुन्नाची मिरवणूक बघाच असे म्हटले आहे.
पारपडलेल्या राज्यसभेच्या निवडणूकीत धनंजय महाडिक हेच कोल्हापूरचे खरे राजकीय पैलवान ठरले आहेत. तर त्यांच्या विजयाने राज्यातील भाजपमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहेच. तर त्यांच्या विजयाने कोल्हापूरच्या भाजपमध्ये नवसंजवनी आली आहे. तसेच किमान 8 वर्षांनंतर महाडिक घरात गुलाल लागला आहे. त्यामुळे धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर कोल्हापूरमध्ये भाजपने विजयी जल्लोष साजरा केला. तसेच धनंजय यांच्या विजयानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आपली प्रतिक्रिया देताना उद्या मुन्नाची मिरवणूक बघाच असे म्हटले आहे. तसेच महाडिकांना लढायची सवय आहे, घाबरण्याचे कारण नाही, असही त्यांनी म्हटलं आहे. तर माझं नाव महादेव, उद्या मुन्नाची मिरवणूक बघा असे सांगत त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यात कोणत्या पद्धतीने स्वागत होईल, असं ही त्यांनी म्हटलं आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

