Shivraj Patil Passes Away : माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी लातूरमधील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. खासदार, राज्यपाल यांसारखी अनेक महत्त्वाची पदे भूषवत त्यांनी काँग्रेस पक्षात मोठे योगदान दिले होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे. लातूरमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी दुःखद बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. काँग्रेस पक्षासाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे. त्यांची दीर्घकाळची राजकीय कारकीर्द अत्यंत प्रभावी राहिली, ज्यात ते सुमारे 35 ते 40 वर्षे खासदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी त्यांच्या देवघर येथील निवासस्थानाकडे धाव घेतली आहे.
काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन
'कुंभमेळासाठी येणारे साधू संत जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर...'
डोळे फुटले नाही आमचे, वडेट्टीवार सभागृहातच भडकले, नेमकं घडलं काय?
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर

