Nandedच्या मालेगावमधील झेडपीच्या शाळेत फ्री-स्टाईल हाणामारी

Nandedच्या मालेगावमधील झेडपीच्या शाळेत फ्री-स्टाईल हाणामारी

| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 7:01 PM

माजी उपसरपंच आणि शालेय शिक्षण समिती अध्यक्षामध्ये फ्री स्टाईल मारामारी (Fighting) झाली. हा हाणामारीचा प्रकार सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाला आहे. सिद्धार्थ वाघमारे असे माजी उपसरपंचाचे आणि परमेश्वर इंगोले असे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्षांचे नाव आहे.

नांदेड : शाब्दिक वादाचे हाणामारीत पर्यावसन होऊन माजी उपसरपंच आणि शिक्षण समिती अध्यक्ष मुख्याध्यापकांच्या दालनातच एकमेकांना भिडल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील मालेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली आहे. माजी उपसरपंच आणि शालेय शिक्षण समिती अध्यक्षामध्ये फ्री स्टाईल मारामारी (Fighting) झाली. हा हाणामारीचा प्रकार सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाला आहे. सिद्धार्थ वाघमारे असे माजी उपसरपंचाचे आणि परमेश्वर इंगोले असे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्षांचे नाव आहे. हा हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.