Gadchiroli | गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक, 26 नक्षलवादी ठार

नक्षलविरोधी पोलीस पथकाला गडचिरोली जिल्ह्यात मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले. पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. आहेत. त्यांना उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आलेय. पोलिसांची मागील तीन वर्षातील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.

आज (13 नोव्हेंबर) सकाळी धानोरा तालुक्यातील मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथक गस्तीवर होते. यावेळी या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली. या नक्षलवाद्यांनी छत्तीसगड भागातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन केले. या मोहिमेत जवळपास 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI