Gujarat : आनंद – वडोदरा जिल्ह्याला जोडणारा गंभिरा पूल कोसळला
Gambhira Bridge Collapse : गुजरातमधील मुसळधार पावसाने वडोदरा आणि आनंदला जोडणारा गंभीरा पूल महिसागर नदीत कोसळला आहे.
गुजरातमधील मुसळधार पावसाने वडोदरा आणि आनंदला जोडणारा गंभीरा पूल महिसागर नदीत कोसळला, ज्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. पूल कोसळताना त्यावरून जाणारी अनेक वाहने नदीच्या प्रवाहात वाहून गेली. अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य हाती घेतले आहे. या दुर्घटनेमुळे वडोदरा आणि आणंदमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसामुळे महिसागर नदीची पाण्याची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचली होती. या पाण्याच्या प्रचंड दाबामुळे कमकुवत झालेला गंभीरा पूल अखेर कोसळला. हा पूल वडोदरा आणि आणंद या दोन प्रमुख शहरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्याला सुरुवात केली.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

