Ganesh Chaturthi 2021 LIVE | मुंबईच्या राजाची प्राणपतिष्ठा लाईव्ह

मुंबईच्या राजाची प्राणपतिष्ठा लाईव्ह. मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक म्हणून गणेश गल्लीचा गणपती प्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे भाविकांना गणेश गल्ली्च्या राजाचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र, यंदा भाविकांना ही सोय ऑनलाईन उपलब्ध झाली आहे. 

आजपासून लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. बाप्पाची पूजा आणि आरास करण्यासाठी गणेशोत्सवात फुलांची मोठी मागणी असते. आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने  दादर फुल मार्केटमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अगदी पहाटेपासून नागरिकांनी खरेदीसाठी तोबा गर्दी केली होती. फुल मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी होणार हे माहिती असूनही इथे कुठल्याही प्रकारच्या पोलिस बंदोबस्त दिसला नाही किंबहुना महापालिकेचे कर्मचारी देखील दिसले नाही.

आजपासून पुढचे दहा दिवस गणेशोत्सवाची धूम असणार आहे. पण या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. अशावेळी शासनाने घालून दिलेले कोरोनाचे सगळे नियम पाळून राज्यातील नागरिकांना गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. पण लोकांनी नियमांकडे साफ दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. पहाटे पाच पासून नागरिकांनी दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी केली. अनेक लोकांनी मास्क लावलेला नाहीये. तर नागरिक सोशल डिस्टन्सिंगचं देखील पालन करत नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI