महाराष्ट्राचा बिहार होतोय? ‘एकदा कार्यक्रमाला येऊन तर बघा…’ गौतमी पाटील स्पष्टचं बोलली…
काही दिवसांपूर्वी घनश्याम दराडे उर्फ छोटा पुढारी याने गौतमी पाटीलवर निशाणा साधला होता. "गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार करू नये, आम्ही खपवून घेणार नाही", असा इशारा छोटा पुढारी घनश्याम दराडेने दिला होता. यावर गौतमी पाटीलने घनश्याम दराडेला जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.
अहमदनगर : काही दिवसांपूर्वी घनश्याम दराडे उर्फ छोटा पुढारी याने गौतमी पाटीलवर निशाणा साधला होता. “गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार करू नये, आम्ही खपवून घेणार नाही”, असा इशारा छोटा पुढारी घनश्याम दराडेने दिला होता. यावर गौतमी पाटीलने घनश्याम दराडेला जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. “मी महाराष्ट्राची संस्कृती जपते, इतरही काहीजण आहेत, तुम्हाला फक्त गौतमी पाटीलच का दिसते? माझ्या कार्यक्रमाला येऊन बघा, काय बिहार होतोय ते मला सांगा”, अशी प्रतिक्रिया गौतमी पाटीलने दिली आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा हुल्लडबाजांचा धिंगाणा पाहायला मिळाला. पारनेर तालुक्यातील सुपा येथे एका हॉटेलच्या वर्धापन दिनानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि खाजगी सुरक्षा रक्षकांनी या हुल्लडबाजांना शांत राहण्याचा सल्ला दिला. पण तरीही हुल्लडबाज ऐकायला तयार नव्हते. अखेर पोलीस आणि खासगी सुरक्षा रक्षकांनी या हुल्लडबाजांना चांगलाच लाठीचा प्रसाद दिला.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

