गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांचा करेक्ट कार्यक्रम, अहमदनगरमध्ये पोलिसांनी नेमकं काय केलं?

गौतमी पाटील हिच्या नाशिकमधील कार्यक्रमात हुल्लडबाजांनी अगदी मीडिया प्रतिनिधींवर हल्ला केला होता. अनेक पत्रकारांना जखमी केलं होतं. पण अहमदनगरमध्ये पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांचा चांगलाच करेक्ट कार्यक्रम केला आहे.

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांचा करेक्ट कार्यक्रम, अहमदनगरमध्ये पोलिसांनी नेमकं काय केलं?
फाईल फोटो
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 6:35 AM

अहमदनगर : डान्सर गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा हुल्लडबाजांनी धिंगाणा घातल्याची माहिती समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील सुपा येथे एका हॉटेलच्या वर्धापन दिनानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि खाजगी सुरक्षा रक्षकांनी या हुल्लडबाजांना शांत राहण्याचा सल्ला दिला. पण तरीही हुल्लडबाज ऐकायला तयार नव्हते. अखेर पोलीस आणि खासगी सुरक्षा रक्षकांनी या हुल्लडबाजांना चांगलाच लाठीचा प्रसाद दिला. त्यानंतर ते बाजूला झाले.

दुसरीकडे गौतमी पाटील हिच्यावर महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दराडे याने टीका केलीय. गौतमीताई महाराष्ट्राचा बिहार करु नका, असं घनशाम दराडे म्हणालाय. त्यावर गौतमीने आपली प्रतिक्रिया दिलीय. विशेष म्हणजे गौतमी पाटील हिच्यावर अनेकांकडून टीका केली जातेय. त्या सर्वांना गौतमीने प्रत्युत्तर दिलं आहे.

गौतमीने टीका करणाऱ्यांना आपल्या शब्दांत सुनावलं आहे. “मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. इतरही काही जण आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटीलच दिसते का? आता काही चूक न करता टीका केली जातेय. माझ्या कार्यक्रमाला येऊन बघा. काय बिहार होतोय ते मला सांगा”, अशी भावनिक प्रतिक्रिया गौतमी पाटील हिने यावेळी दिली.

हे सुद्धा वाचा

घनश्याम दराडे नेमकं काय म्हणाला?

“गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये. गौतमी पाटलांचा कोणत्याही कार्यक्रम शांततेत पार पडलाय, असं दिसत नाही. लावणी ही लावणी ठेवा. त्याला अश्लीलतेचा रंग देवू नका. तो अश्लीलतेचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. तुम्हाला फेमस व्हायचे असेल तर जरूर व्हा. मात्र ते तुमच्या कर्तुत्वावर. चुकीच्या पद्धतीने अश्लीलता दाखवून फेमस होऊ नका”, असा सल्ला महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दराडे याने दिला.

घटनेनंतर चार जण पळून जाण्यास यशस्वी झाले. मात्र शहादेव धायतडक आणि शुभम धायतडक यांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. राजेंद्र किर्तने यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामिणचे पोलीस उपअधिक्षक अजित पाटील यांनी पाथर्डी पोलीस ठाण्याला भेट देत घटनेची माहिती घेतली. तसेच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायय्क पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, कौशल्य रामनिरंजन वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. कौशल्य वाघ हे पुढील तपास करीत आहेत.

“छत्रपती शिवाजी महाराज हे बाई वाचवणारे होते नाचवणारे नव्हते हे तरुणांनी लक्षात घ्यायला हवे. छोटा भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगतो की, वाकडेतिकडे चाळे करून तुम्ही डान्स केला तर येणाऱ्या पिढीवर काय संस्कार होतील? नव्या पिढीला वाटेल की असे वाकडेतिकडे चाळे करून डान्स केला तर फार फेमस होतं. त्यामुळे नवी पिढी त्याकडे आकर्षित होईल आणि त्याप्रमाणे वागेल”, अशा शब्दांत घनश्यामने गौतमीला सुनावलं होतं. त्यावर गौतमीने प्रत्युत्तर दिलं.

गौतमीचं प्रत्युत्तर काय?

“मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला दिसत नाहीत का? माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा?” असा सवाल करत गौतमी पाटील हिने घनश्यामच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.