Video : मी काय महाराष्ट्राचा बिहार केला काय?; गौतमी पाटील कुणावर संतापली?

आयोजकांनी तिकीट लावून बार्शीतील कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे त्यांनी सांगितलं तेव्हाच मी स्टेजवर गेले. त्यात माझं काय चुकलं?, असा सवाल गौतमी पाटील हिने केला आहे.

Video : मी काय महाराष्ट्राचा बिहार केला काय?; गौतमी पाटील कुणावर संतापली?
gautami patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 7:23 AM

पंढरपूर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आपल्या भरगच्च कार्यक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असते. गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण ठरलेलंच आहे. गौतमी पाटीलचा प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल्लच असतो. त्यामुळे तिची चर्चा होतेच. मात्र, सध्या गौतमी वेगळ्याच अडचणीत सापडली आहे. गौतमीच्या नाशिकच्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्याच होत्या. या कार्यक्रमाला लोक फिरकलेच नाही. तर बार्शीतील कार्यक्रमात गौतमी उशिरा पोहोचली. त्यामुळे आयोजक आणि गौतमीत वादावादी झाली. या दोन्ही गोष्टींमुळे गौतमी चांगलीच चर्चेत आली आहे. या सर्व प्रकरणावर गौतमीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सांगोला तालुक्यातील घेरडी गावात रासप नेत्याने गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तिने मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने छोटा पुढारी घनश्याम दराडे याच्या आरोपाचा समाचारही घेतला. मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला दिसत नाहीत का? माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा?, असा सवाल गौतमी पाटील हिने केला.

हे सुद्धा वाचा

मारहाण नको, वाद नको, एन्जॉय करा

नाशिकमध्ये चाहत्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. त्यामुळे ती चाहत्यांवर चांगलीच भडकली. पत्रकारांना धक्काबुक्की होणं चुकीचंच आहे. अशा गोष्टींचा निषेध केलाच पाहिजे, असं सांगतानाच मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी सोडून पुढं जाते. मी असं काय केलंय? मी महाराष्ट्राचा बिहार केला काय? मला याचं उत्तर मिळालंच पाहिजे, असं गौतमी पाटील म्हणाली. मला त्या गोष्टीची माहिती नव्हती. मी कार्यक्रमातून निघाले. अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर मला कळलं. वाद घालू नका. कार्यक्रम एन्जॉय करा. कुणाला मारहाण करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

माझी काय चूक होती?

मी कार्यक्रमाला वेळेत गेले होते. कोणत्याही कार्यक्रमात मी वेळेत जाते. जेव्हा आयोजक सांगतात तेव्हाच मी स्टेजवर जाते. आयोजकांनी तिकीट लावून बार्शीतील कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे त्यांनी सांगितलं तेव्हाच मी स्टेजवर गेले. त्यात माझं काय चुकलं? असा सवाल तिने बार्शीतील वादावर केला. कार्यक्रमाची परवानगी रात्री 10 वाजेपर्यंतची होती. कार्यक्रमाची वेळ संपल्यानंतर पोलिसांनी कार्यक्रम बंद करायला सांगितलं. म्हणून आम्ही कार्यक्रम बंद केला, असंही तिने स्पष्ट केलं. माझं लग्न ठरलंय हे मी पेपरातच वाचलंय. पण माझं लग्न ठरलेलं नाहीये. सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाही. जेव्हा ठरेल तेव्हा नक्कीच सांगेल, असंही ती म्हणाली.

हिशोबच दिला

बार्शी येथील कार्यक्रमात फसवणूक झाल्याचा आरोप करत आयोजक गायकवाड यांनी गौतमी पाटील आणि केतन मारणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र मुळातच आयोजकाने पोलीस परवानगी काढली नव्हती. शिवाय कार्यक्रमाचे आयोजक गायकवाड हे कार्यक्रमस्थळी वेळेत न आल्याने कार्यक्रम उशिरा सुरु करावा लागल्याचा खुलासा गौतमी पाटीलच्या आयोजकांकडून करण्यात आलाय. याप्रकरणी आता गौतमीच्या आयोजकांकडून बाजू मांडण्यात आलीय.

कार्यक्रमासाठी ठरलेल्या रक्कमेपैकी फक्त पन्नास हजार रुपये आणि व्हॅनिटी व्हॅनसाठी 40 हजार रुपये देण्यात आले. उर्वरित रक्कम येणे बाकी असल्याने यातtन पळ काढण्यासाठी गायकवाड यांनी आरोप करत आहेत. त्यामुळे पोलीस तक्रार दिली आहे, असं गौतमीच्या आयोजकांनी सांगितलं. तर या तक्रारीचं कार्यक्रमाच्या आयोजकांनी खंडन केलं आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.