LPG Price : महिला दिनी मोदींकडून मोठं गिफ्ट! सिलेंडरच्या किंमती ‘इतक्या’ रुपयांनी कमी
महिन्याच्या सुरूवातीला १ मार्च रोजी सरकारी कंपन्यांनी व्यवसायिक गॅसच्या किंमतीत वाढ केली होती मात्र त्यावेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केला नव्हता. मात्र आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिलेंडरच्या किंमती १०० रुपयांनी केल्या स्वस्त
मुंबई, ८ मार्च २०२४ : घरगुती गॅस सिलेंडर १०० रूपयांनी स्वस्त झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. नारी शक्तीला वंदन करत पंतप्रधान मोदींनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत १०० रुपयांची कपात करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, महिन्याच्या सुरूवातीला १ मार्च रोजी सरकारी कंपन्यांनी व्यवसायिक गॅसच्या किंमतीत वाढ केली होती मात्र त्यावेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केला नव्हता. मात्र आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिलेंडरच्या किंमती १०० रुपयांनी स्वस्त करण्यात आल्या. नारी शक्ती अंतर्गत कुकींग गॅसची किंमत कमी झाल्याने त्यांना मोलाची मदत ठरणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. महिलांचे जीवन सुसह्य करणे आणि त्यांना बळ देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

