LPG Price | महिला दिनी पंतप्रधानांकडून गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांनी केल्या कमी

LPG Cylinder Price | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने पुन्हा एकदा खेळी खेळली. गेल्या काही वर्षांपासून गॅसच्या किंमती दुप्पटीहून अधिक झाल्या. किचन बजेट वाढल्याने नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी घरगुती गॅसच्या किंमती कमी करण्याची खेळी खेळण्यात आली आहे.

LPG Price | महिला दिनी पंतप्रधानांकडून गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांनी केल्या कमी
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 9:28 AM

नवी दिल्ली | 8 March 2024 : जागतिक महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना गिफ्ट दिले. नारी शक्तीला नमन करत त्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांची कपात करण्याची घोषणा केला. 1 मार्च रोजी सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या किंमतीत वाढ केली. पण घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल केला नव्हता. आज 8 मार्च, जागतिक महिला दिनी सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांनी स्वस्त करण्यात आल्या. गेल्या काही वर्षांत सिलेंडरचे भाव दुप्पटीहून अधिक झाले. काही महिन्यांपूर्वी तर हा भाव 1100 रुपयांच्या घरात पोहचला होता. त्यानंतर सरकारने त्यात 200 रुपयांची कपात केली होती. सबसिडी असलेल्या 14.2 किलोग्रम घरगुती गॅस आता शंभर रुपयांनी स्वस्त झाला आहे.

किचन बजेटवरील ताण होईल कमी

या निर्णयामुळे देशातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक बोजा कमी होईल. नारी शक्ती अंतर्गत कुकींग गॅसची किंमत कमी झाल्याने त्यांना मोलाची मदत ठरणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. महिलांचे जीवन सुसह्य करणे आणि त्यांना बळ देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

सध्या भाव काय

काही वर्षांपूर्वी 500 रुपयांच्या पण आत मिळणारे घरगुती गॅस सिलेंडर 1100 रुपयांच्या घरात पोहचले होते. याविषयी ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दिवाळीच्या जवळपास केंद्र सरकारने 200 रुपयांची सबसिडी दिली होती. त्यानंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत 903 रुपये, कोलकत्तामध्ये 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईत हा भाव 918.50 रुपये आहे.

तीन महिन्यात 60 रुपयांची दरवाढ

डिसेंबरपासून मार्च महिन्यापर्यंत, जानेवारीचा अपवाद वगळता एलपीजी सिलेंडरचा दर 60 रुपयांनी वाढले आहेत. 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजीच्या भावात वाढ करण्यात आली आहे. लोकसभेचा बिगुल केव्हा पण वाजू शकतो. त्या आधी ग्राहकांच्या खिशावर ताण आला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली होती. सध्या ग्राहकांना हॉटेलिंगसाठी जादा पैसा मोजावा लागत आहे.

  • दिल्लीत 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅसची किंमत 1755.50 रुपयांहून वाढून 1769.50 रुपयांवर
  • मुंबईत 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅसची किंमत 1708 रुपयांहून वाढून 1723 रुपयांवर
  • चेन्नईत कर्मशियल गॅसची किंमत 1869 रुपयांहून 1887 रुपयांवर
  • तर चेन्नईत 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस आता 1937 रुपये झाला. पूर्वी हा भाव 1924.50 रुपये होता
Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.